लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 22 June 2020

आयएनएस शिवाजी नौदल प्रशिक्षण संस्थेमधील करोना बधितांची संख्या सातवर ; आज तीन नव्या रुग्णांची भर

आज सोमवारी लोणावळा शहरात असलेल्या आय.एन.एस. शिवाजी या नौदल प्रशिक्षण केंद्रामधील ३ नव्या प्रशिक्षणार्थी कॅडेट्स तरुणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नौदल प्रशिक्षण संस्थेमधील करोना बधितांची संख्या चार वरून वाढून सात झाली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार लोणावळ्यातील आय.एन.एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्रात याच महिन्यात काही कॅडेट्स नौदल प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. त्यानंतर या सर्वांना आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्येच क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र यातील काही तरुणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील वानवडी येथील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० जून रोजी तीन, २१ जून रोजी एक तर आज सोमवारी २२ जून रोजी तीन प्रशिक्षणार्थी कॅडेट्सचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सोमवारी नव्याने करोना बाधित आढळलेल्या तीन प्रशिक्षणार्थी पैकी एक जण मूळचा मथुरा, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून दुसरा आनंतपुर, आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहे. तर तिसरा प्रशिक्षणार्थी हा हरियाणा येथील मूळचा रहिवासी आहे.

आय.एन.एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्रा सारख्या ठिकाणी मागील तीन दिवसांपासून रोजच्या रोज करोना बाधित झालेल्या प्रशिक्षणार्थी कॅडेट्सची वाढती संख्या बघता संपूर्ण लोणावळा शहरात खळबळ उडाली असून सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच भारतीय संरक्षण व्यवस्थेचे भविष्य असणारे हे तरुण लवकरात लवकर बर व्हावे यासाठी प्रार्थना देखील करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages