लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 16 June 2020

ओळकाईवाडी, कुसगाव बुद्रुक येथील करोना बाधित डॉक्टरचा मृत्यू; मावळात मृतांची संख्या दोन

लोणावळा शहरालगत असलेल्या ओळकाईवाडी, कुसगाव बुद्रुक येथील करोना बाधित डॉक्टरचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. संबंधित डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे १४ जून रोजी समोर आलं होतं. त्यानंतर कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ५० वर्षीय डॉक्टर पाच जून रोजी आजारी असल्या कारणाने पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्यात करोनाची लक्षण दिसून आल्याने १२ जून रोजी त्यांचे स्वॅब नमुने करोनाच्या चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या चाचणीचा अहवाल रविवारी १४ जून रोजी संध्याकाळी प्राप्त होऊन ते करोना बाधित असल्याच निदान झालं होत. त्यानंतर त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयातच उपचार सुरू होते, मात्र अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

मावळ तालुक्यात करोना मुळे मृत झालेली ही दुसरी व्यक्ती असून मंगळवारी दुपारी लोणावळा शहरातील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला होता. मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण ४५ रुग्ण करोना बाधित आढळून आले असून त्यात ग्रामीण भागातील २९ तर शहरी भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. यातील आतापर्यंत १७ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून २६ रुग्ण अद्यापी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages