करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहे. या आदेशानुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि लोणावळा नगरपरिषदेने समांतर कारवाई करीत २५ जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरताना, थांबलेले असताना किंवा गाडी चालवीत असताना जर कोणी व्यक्तीने मास्क वापरला नसल्यास त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश मा.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी नुकतेच पारित केले आहे. त्यानुसार लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंद्रायणी नदी पूल व बाजारपेठ याठिकाणी लोणावळा शहर पोलीस व नगरपरिषदेने संयुक्त कारवाई केली.

No comments:
Post a Comment