आज मंगळवारी लोणावळा ग्रामीण परिसरातील डोंगरगाव वाडी गावामध्ये तीन जण तर भैरवनाथ नगर, कुसगाव याठिकाणी एक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामुळे लोणावळा ग्रामीण परिसरात आता करोना बधितांची संख्या पाच झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी २६ जून रोजी करोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या लोणावळा शहर पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या डोंगरगाव वाडी येथील होमगार्डच्या कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली असून आज मंगळवारी या सर्वांचे अहवाल प्राप्त झाले आहे. संबंधित होमगार्ड करोना बाधित असल्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वॅब करोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. या तपासणी मध्ये संबंधित होमगार्डचे आजी, आजोबा आणि त्याचे वडील अशा तिघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
याशिवाय त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या भैरवनाथ नगर येथील एका २७ वर्षीय युवकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहराच्या लगत असलेल्या ग्रामीण परिसरातील ऍक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या केवळ दोन दिवसात पाच झाली आहे.

No comments:
Post a Comment