लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 5 June 2020

ट्रेकर्सचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या राजमाची गावात निसर्गाचा हाहाकार. पावसात रस्ते वाहून जात असल्याने, मान्सून सुरू होण्यापूर्वी मदत पोचणं आवश्यक


पर्यटकांचा आणि ट्रेकर्सचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या राजमाची गावात दोन दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग या चक्रीवादळाने हाहाकार उडवून दिला आहे. या गावचे चित्रच निसर्ग ने बदलून टाकलं आहे. येथील अनेक आदिवासी कुटुंबाचे संसार उघड्यावर आले तर अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच शेकडोंच्या संख्येने मोठमोठी झाड जमिनीवर मोडून पडली.

राजमाची उढेवादी हे आदिवासी गाव लोणावळा शहरापासून १६ किलोमीटर दूर जंगलात वसलेले असून या ठिकाणी राजमाची, उढेवादी, वन्हाटी आणि फणसराई आशा चार वस्त्या आहेत. या चारही वस्त्यांवर सुमारे ६० ते ६५ आदिवासी कुटुंबातून २५० लोक राहतात. वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे आजवर रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजांपासून दूर राहिलेल्या या गावाला आजवर ज्या निसर्गाने साथ दिली, त्याच निसर्गाच नाव धारण करून आलेल्या चक्रीवादळाने येथील गावकऱ्यांचे संसार होत्याचे न्हवते करून टाकलं.

निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात सर्वाधिक तडाखा हा राजमाची गावाला बसला. राजमाची गावातील ४ घर जवळपास जमीनदोस्त झाली असून ३ घरांसह जिल्हापरिषद शाळेची इमारत तसेच एका स्थानिक संस्थेच्या इमारतीच्या छापराचे ८० ते १०० टक्के पत्रे फुटले किंवा उडून गेले आहेत. याशिवाय १८ ते २० घरांच्या २० ते ५० टक्के पत्र्यांचे नुकसान झाले आहे. वन्हाटी गावातील ४ ते ५ घर जमीनदोस्त झाली असून १० ते १२ घरांचे २० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. फणसराई येथील ४ झोपड्या वजा घरे वाऱ्यासोबत उडून गेली तर उर्वरित चार झोपड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच बहुतेक सर्व घरांमधील धान्य, कपडेलत्ते, अंथरुण पांघरूण पाण्यात भिजून खराब झाले आहेत.

सदर नुकसानीची खबर मिळताच गुरुवारी ४ जून रोजी आमदार सुनील शेळके, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मंडल अधिकारी ज्ञानेश्वर कारकर, तलाठी संदेश शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तात्काळ मदत पोचविण्याचे आश्वासन दिले. पावसात गावाकडे जाणारे रस्ते वाहून जात असल्याने मान्सून सुरू होण्यापूर्वी या गावांमधून मदत तसेच छापरासाठी आवश्यक पत्रे पोचणे अत्यंत गरजेचे असल्याने आता राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंग साठी येणारे अनेक ट्रेकर्स ग्रुप राजमाचीकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे.

डेला कंपनीच्या सहकार्यामुळे राजमाचीला जाणार रस्ता मोकळा

लोणावळा शहरकडून राजमाची गावाला जाणार एकमेव रस्ता, असंख्य झाड आडवी पडल्याने वाहतुकीला पुर्णतः बंद झाला होता. त्यामुळे मदत दूरच, राजमाची आणि परिसरात माणूस पायी पोचणं देखील अशक्य झालं होतं. अशामध्ये कुणे गाव येथील डेला रिसॉर्ट या कंपनीचे जिमी मिस्त्री यांनी गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी आणि दोन चेन सॉ घेऊन सोबत सुमारे २० कर्मचारी तातडीने रवाना केला. या सर्वांनी युद्धपातळीवर काम करीत एका दिवसात हा बंद रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. सोबतच गावामध्ये घरांवर धोकादायक रित्या पडलेली झाड कापून दूर केली. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages