लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 2 June 2020

मावळ तालुक्यात आणखी एका नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण


मावळ तालुक्यात टाकवे बुद्रुक गावाजवळ एका कंपनीच्या कामगार वसाहतीत एका नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित बाळाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला त्याच्या आई-वडिलांनी पुणे येथे ससून रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी बाळाची करोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

यापूर्वी कामशेत येथेही एका नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोना लागण झाली आहे. कोरोनाची बाधा झालेले हे तालुक्यातील दुसरे बाळ आहे.

बाळाच्या निकटच्या संपर्कातील आई-वडिलांसह सात जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार बर्गे यांनी सांगितले. दरम्यान टाकवे-बेलज रस्त्यावरील सुयेक्स फ्लोरा कंपनीचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून टाकवे व बेलज ही दोन गावे बफर झोनमध्ये घेण्यात आली आहेत, असे मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेशात नमूद केले आहे.


मला फॉलो करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages