लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 2 June 2020

लोणावळा शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार; नगरपरिषदेचा नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा

निसर्ग या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसत असतानाच घाटमाथ्यावर असलेल्या लोणावळा शहराला देखील या वादळाचा तडाखा बसण्याची चिन्ह आहे. लोणावळा शहरात सकाळपासूनच अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं तुटून पडण्याच्या घटना घडत असून, त्यामुळे शहरातील काही अंतर्गत रस्ते देखील बंद झाले आहे.

अतितीव्र चक्रीवादळामध्ये जोरदार वारे वाहण्याची व पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं लोणावळेकरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण शहरात स्पीकरच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने गावातील कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी नगरपरिषद सांगतील त्या शाळेत त्वरित स्थलांतरित व्हावे, आवश्यक पिण्याच्या पाणी भरून ठेवाव्यात, सर्वांनी आपले मोबाईल्स चार्ज करून ठेवावेत, इन्वर्टर चार्ज करून ठेवावेत, चक्रीवादळा दरम्यान कोणीही विनाकारण घरातून बाहेर पडू नये, नदी व धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा असल्याने तेथील लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, झाडांच्या खाली किंवा जवळ थांबू नये, कोणीही अफवांवर विश्वास ठेवून घाबरू नका, कोणाला काही मदत लागल्यास लोणावळा नगरपरिषद टोल फ्री क्रमांक १८००२३३५४६३ या नंबर वर संपर्क साधावा अशा सूचनांचा समावेश आहे. 


चक्रीवादळामुळे लोणावळा शहरात बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतच ६ ते ७ मुख्य रस्त्यावर मोठमोठी झाडं तुटून पडली आहे. नगरपरिषदेने ही तुटलेली झाड बाजूला करण्यासाठी दोन पथक तैनात केल्या असून मदतकार्यासाठी वेगवेगळी १० पथकं तैनात केली आहेत. याशिवाय शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू कार्य करणाऱ्या संस्थेचे २० सदस्यांचे पथक मदतीला पाचारण करण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages