विनापरवाना दारू विक्री केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर व्यक्तीकडून ९ हजार १८० रुपये किमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
अमित परशुराम शेडगे (वय ३६, रा.गवळीवाडा, लोणावळा, ता.मावळ) असे या कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित परशुराम शेडगे हा श्रीराम वाडी, गवळीवाडा येथे भिंतीचे आडोशाला बेकायदेशीर दारू ठेवून, त्याची ओळखीचे लोकांना बेकायदेशीरपणे विक्री करत असताना मिळून आला. याप्रकरणी पो.काँ. राजेंद्र महादेव मदने यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अमित शेडगे यांच्याकडून पोलिसांनी ७,२०० रुपये किंमतीच्या मॅकडॉल नंबर वन विस्की नावाच्या प्रत्येकी १८० मिली मापाच्या दारूच्या एकूण ४८ बाटल्या तर १९८० रुपये किंमतीच्या टूबर्ग नावाच्या बिअरच्या प्रत्येकी ६५० मिली मापाच्या एकूण १२ बाटल्या जप्त केल्या आहे.
लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, मनोज मोरे, अजीज मेस्त्री यांच्या पथकाने ही कारवाई करीत आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सामील प्रकाश हे पुढील तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment