करोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिणामकारक ठरणाऱ्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीनं करण्यात आले. एकूण २० हजार लोकांना या गोळ्या वाटण्यात आल्या.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांमुळे माणसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा केला जात आहे. आज मंगळवार दिनांक ०२ जून रोजी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सादर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. वैभव स्वामी, रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष उदय पाटील, रविंद्र कुलकर्णी, जयवंत नलोडे, पुंडलिक वानखेडे, गोरख चौधरी, दिलीप पवार, मुस्तफा, नारायण शारवाल, नितीन कल्याण, धीरूभाई कल्याणजी, आशिष मेहता, बापू पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

छान
ReplyDeleteमुस्तफा आणि नारायण शारवाल असे दोन वेगळे मान्यवर होते
ReplyDeleteबदल केला आहे
ReplyDelete