लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.रवि पवार यांनी कोविड-19 संदर्भात लोणावळेकर जनतेला केलेल्या आवाहणाचे काही ठळक मुद्दे
◆ लॉकडाऊनचा निर्णय हा मा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत आदेशानंतरच घेण्यात येणार, त्याचप्रमाणे असा निर्णय घेतल्यास नागरिकांना कळविले जाईल.
◆ शहरात आतापर्यंत १६ करोना बाधित रुग्ण
◆ करोना टाळायचा असल्यास जीवनशैली बदलण्याची गरज
◆ सोशल डिस्टनसिंग पाळणे आवश्यक
◆ एक सामाजिक बांधिलकी म्हणून मास्कचा व्यवस्थित वापर करा
◆ हृदय विकार, मधुमेह यांसारखे आजार असणाऱ्या लोकांनी तसेच वयस्कर लोकांनी फार बाहेर फिरणं टाळावं.
◆ कंटेन्मेंट झोन मध्ये घालून दिलेले प्रतिबंध पाळा
◆ ज्या दुकानांच्या पुढं गर्दी होणार, त्यांच्यावर भरारी पथकाद्वारे कारवाई
◆ ज्या दुकानांवर दोन पेक्षा जास्त वेळा दंड होणार त्या दुकानदारावर पुढील १५ दिवस दुकान बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार
◆ दुकानं उघडी ठेवण्यासाठी घालून दिलेल्या वेळांचे तंतोतंत पालन करा, अन्यथा दुकान बंद ठेवण्याची कारवाई
◆ बाहेरून आलेल्या लोकांनी गर्दी करून राहू नये, तसेच अशा लोकांनी बाजारपेठत गर्दी करू नये
व्हिडीओ बघण्यासाठी येथे 👇क्लिक करा
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा


No comments:
Post a Comment