लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 1 July 2020

रेल्वे कॉलनी, लोणावळा येथील करोना बाधित महिलेचा मृत्यू

लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी याठिकाणी आढळून आलेल्या करोना बाधित महिलेचा काल बुधवारी मृत्यू झाला. या ५७ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल २६ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर करोनाबाधित महिलेला बुधवारी २४ जून रोजी संध्याकाळी श्वसनास व इतर त्रास होऊ लागला. त्यामुळे या महिलेला तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी करोना तपासणीसाठी या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. शुक्रवारी २६ जून रोजी आलेल्या तपासणी अहवालात ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. सदर महिला ही रेल्वे विभागात कर्मचारी होती. या महिलेला अगोदरपासूनच यकृताचा आजार असल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ होती. अखेर बुधवारी तिचा मृत्यू झाला. लोणावळा शहरात करोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन झाली असून, यापूर्वी वलवण येथील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला होता.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages