लोणावळा शहरातील नांगरगाव विभागातील एक ६० वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज गुरुवारी या व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला.
मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती हा निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. करोनाची लक्षणे दिसल्याने बुधवारी ०१ जुलै रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज गुरुवारी ०२ जुलै रोजी सदर तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित व्यक्तीला अगोदरपासून मधुमेह, हायपरटेंशन, ह्रदयविकार असे आजार असल्याची माहिती मिळत आहे. सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे नमुने कोव्हिड केअर सेन्टर, तळेगाव दाभाडे येथे घेण्यात येणार आहे. याशिवाय नांगरगाव मधील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. लोणावळा शहरातील करोना बधितांची संख्या आता एकूण पाच झाली असून त्यातील वलवण आणि पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर खंडाळा येथील दोन जण पुर्णतः बरे झाले आहे.

No comments:
Post a Comment