लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 3 July 2020

लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील त्या पोलीस कर्मचाऱ्याची करोनावर मात

२६ जून रोजी करोना पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्याने करोना वर मात केली असून आज शुक्रवारी त्याचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने सदर कर्मचाऱ्याला घरी सोडण्यात आले आहे.

सदर पोलीस कर्मचाऱ्याला करोना सारखी लक्षणे जाणवली होती त्यामुळे लोणावळा नगरपालिका आरोग्य केंद्रात १७ जुन रोजी त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर हा कर्मचारी विश्रांतीसाठी म्हणून २१ जून पासून त्याच्या घरीच म्हणजे भोसरी येथे राहिला होता. सदर कर्मचाऱ्याने गुरुवारी २५ जून रोजी एका खाजगी लॅब मार्फत तपासणी करून घेतली असता शुक्रवारी २६ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सदर कर्मचाऱ्यावर आरोग्य केंद्र,भोसरी येथे उपचार सुरू होते. आता हा कर्मचारी पूर्णतः बरा झाला असून त्याला रूग्णालयातून डिशचार्ज देण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages