लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 15 July 2020

खंडाळ्यातील केळ पेठेत एक जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील खंडाळा विभागात असणाऱ्या केळपेठ येथे एक ५८ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरात आता करोना बधितांची संख्या २३ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीने करोनाची लक्षणं दिसून आल्याने मंगळवारी आपले स्वॅब करोना चाचणी साठी दिले होते. आज त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर केळपेठचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले असून सध्या कुटुंबातील ५ जणांना हाय रिस्क म्हणून क्वारंटाईन करण्यात येणार असून त्यांचे स्वॅब तपासणी साठी घेतले जाणार आहे. खंडाळा विभागातील हा तिसरा रुग्ण असून यापूर्वी दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले होते, मात्र ते दोन्ही रुग्ण पूर्णतः बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.

कोविड केअर सेन्टर, लोणावळा या ठिकाणी काल मंगळवारी एकूण १९ जणांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्यातील ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यातील एक रुग्ण खंडाळ्यातील असून बाकी लोणावळा शहराच्या बाहेरील गावातील आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages