लोणावळा येथील भांगरवाडी परिसरातील दिव्या हाईट सोसायटीमधील एक ३७ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता २४ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीला काही लक्षणं जाणवल्याने त्याने कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा येथे शुक्रवारी आपला स्वॅब करोना चाचणी साठी दिला होता. आज शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भांगरवाडी येथील रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. यातील दोन रुग्ण हे सोमटणे याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आले होते. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment