लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 18 July 2020

खंडाळ्यात अजून तीन तर वलवण येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण; लोणावळा शहरात एकाच दिवसात पाच रुग्ण

लोणावळा शहरात आज शनिवारी भांगरवाडी येथे एक रुग्ण आढळून आल्यानंतर खंडाळा विभागात तीन तर वलवण विभागात एक नवा करोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे शहरात आज करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या ५ झाली आहे तर एकूण रुग्णांची संख्या २८ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा परिसरातील केळपेठ येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या ३५ वर्षीय मुलीचा आणि १० वर्षीय नातवाचा अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय खंडाळ्यातीलच रस्टिक हायलँड परिसरात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या वॉचमनच्या संपर्कात आलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांचे कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी स्वॅब घेण्यात आले होते. 

याशिवाय वलवण विभागात एका ६१ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीने काल शुक्रवारी बढे हॉस्पिटलमध्ये आपला स्वॅब करोना चाचणी साठी दिला होता. तो अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages