Pages

▼

Friday, 24 July 2020

करोना बाधित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला - मुख्याधिकारी रवि पवार


सध्या लोणावळा शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी रवि पवार यांनी लोणावळेकरांशी संवाद साधत काही सूचना देतानाच लोणावळेकरांना काही आवाहन केलं आहे. 

मुख्याधिकारी पवार यांच्या संवादामधील काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे 

🔲 आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार गरम पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा. गरम पाणी प्या, गरम पाण्याच्या गुळण्या करा, हळदीचे दूध प्या. यामुळे घशामध्ये होणारे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल

🔲 घरातील जेष्ठ मंडळींची जास्तीत जास्त काळजी घ्या.

🔲 नगरपरिषदेकडून ६० लोकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. हे सर्व लोक प्लस ऑक्सिमिटर आणि थर्मल गन याच्या साहाय्याने शहरातील जास्तीत जास्त लोकांच्या आरोग्याची तपासणी करणार. तपासणी साठी येणाऱ्या लोकांना सहकार्य करून त्यांना योग्य माहिती पुरवा. यापुढे पहिल्या स्टेजमधील आजारी लोकांना घरीच योग्य उपचार पुरविण्याचा नगरपरिषदेचा मानस

🔲 करोना आज प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. त्यामुळे करोना बाधित व्यक्तींकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज. कोविड रुग्णासोबत सकारात्मक संपर्क ठेऊन त्यांचे मनोबल वाढवा.

🔲 शहरातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना मदतीसाठी पुढं येण्याचे आवाहन - नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्लसऑक्सिमिटर, थर्मलगन, रॅपिड अँटिबॉडीज टेस्ट किटची नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर आवश्यकता. 




No comments:

Post a Comment