लोणावळा येथील टेबललँड, 'जी' वॉर्ड परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या २ झाली आहे तर संपूर्ण लोणावळा शहरातील आजअखेर एकूण रुग्णांची संख्या ४६ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीची स्वॅब चाचणीसाठी कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी घेण्यात आला होता. त्या चाचणीचा अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ३
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४
भांगरवाडी - ११
नांगरगाव - ६
खंडाळा - ९
वलवण - २
गावठाण आणि बाजारपेठ, लोणावळा - ९
रेल्वे विभाग - २
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा
No comments:
Post a Comment