Pages

▼

Thursday, 23 July 2020

बारा बंगला, रेल्वे विभातील महिला करोना बाधित

लोणावळा येथील बारा बंगला, रेल्वे विभातील एका महिलेचा करोना चाचणी अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता लोणावळा शहरात करोना बधितांची एकूण संख्या ४५ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेचे वय ३२ असून तिला त्रास जाणवू लागल्याने तिने एका खाजगी रुग्णालयात जाऊन स्वतःचा स्वॅब करोना चाचणी साठी दिला होता. त्या चाचणीचा अहवाल आज शुक्रवारी प्राप्त झाला असून, पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. सदर महिलेला कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

गवळीवाडा  - ३
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी  - ४
भांगरवाडी  - ११
नांगरगाव  - ६
खंडाळा  - ९
वलवण  - २ 
गावठाण आणि बाजारपेठ, लोणावळा  - ८
रेल्वे विभाग  - २

2 comments:

  1. प्रशासनाकडे आज रिपोर्ट प्राप्त झालाय

    ReplyDelete