लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 25 July 2020

लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश

लोणावळा : राज्यामध्ये महाविकास आघाडी करून सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षात छोट्यामोठ्या कुरबुरी सुरू असून कधी शिवसेनेचे पक्ष कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये तर कधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यातच आता लोणावळा शहरातून देखील अशीच बातमी पुढे आली आहे. लोणावळा शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या एका माजी नगरसेवकाचा शिवसेना पक्षप्रवेश नुकताच घडून आलेला आहे.  

लोणावळा शहरातील खंडाळा येथील कार्यकर्ते परेश बडेकर, कुणाल सपकाळ, सुमित बडेकर, शिवराज चव्हाण यांच्या सोबतच लोणावळा नगरपरिषदचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले मधुकर पवार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला आघाडी जिल्हा संघटक शादान चौधरी, तालुकाप्रमुख राजु खांडभोर, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्ले, समन्वयक जयवंत दळवी, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, उपशहरप्रमुख मनेष पवार, विभागप्रमुख भगवान देशमुख, विभागप्रमुख मोहन मल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या या माजी नगरसेवकाच्या शिवसेना प्रवेशामुळे लोणावळा शहर राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली असून अजून काही कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages