लोणावळा येथील तुंगार्ली, भांगरवाडी आणि आगवाली चाळ परिसरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. आजच्या या तीन रुग्णांमुळे आता लोणावळा शहरातील करोना बधितांच्या संख्येने अर्धशतक पार केलं असून येथील एकूण रुग्ण संख्या ५१ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहरातील तुंगार्ली विभागातील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा तर भांगरवाडी विभागातील एका ५० वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांचे स्वॅब खाजगी रुग्णालयात तपासणी साठी घेण्यात आले होते. याशिवाय रेल्वे कॉलनी, आगवाली चाळ परिसरातील एक २४ वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच लोणावळा ग्रामीण परिसरातील वरसोली गावातील एक ३४ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी कोविड केअर सेन्टर, झालावाडी येथे घेण्यात आला होते. कोविड केअर सेन्टर, झालावाडी येथून सोमवारी १८ जणांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्या १८ जनांपैकी १६ जणांचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आले आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ३
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४
भांगरवाडी - १२
नांगरगाव - ६
खंडाळा - ९
वलवण - २
गावठाण आणि बाजारपेठ, लोणावळा - ११
रेल्वे विभाग - ३
तुंगार्ली - १
अर्धशतकी रुग्णसंख्येनंतरही लोणावळेकरांसाठी आज एक दिलासादायक वृत्त
आज शहरात रुग्णसंख्येने अर्धशतक गाठत असताना लोणावळेकरांसाठी एक दिलासादायक वृत्त देखील आले आहे. आज शहरातील पाच करोना बाधित रुग्णांना पुर्णतः बरे झाल्याने कोविड केअर सेन्टर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत लोणावळा शहरात ५१ बधितांपैकी सक्रिय रुग्णांची संख्या ही २३ असून इतर २५ रुग्ण बरे आतापर्यंत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment