लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 28 July 2020

बकरी ईदच्या अनुषंगाने लोणावळा नगरपरिषद कार्यालयात बैठक संपन्न

करोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आगामी बकरी ईद सण कशाप्रकारे साजरा करण्यात यावा यासंदर्भात सूचना देण्यासाठी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात मंगळवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवि पवार, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, आरोग्य विभाग अधिकारी मेमन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला मुस्लिम कमिटीचे अहमद इस्माईल शेख, अन्वर शेख, इम्रान तांबोळी यांच्यासह शहरातील मटण विक्रेते उपस्थित होते. 

लोणावळा नगरपरिषद क्षेत्रामध्ये करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी रवि पवार यांनी मुस्लिम बंधूंना आवाहन करताना काही मार्गदर्शक सूचना दिल्या. यात बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपापल्या घरातच अदा करावा, कुर्बानी साठी जनावरे खरेदी करावयाची झाल्यास ती ऑनलाईन पध्दतीने खरेदी करावी, शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, ईदच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये, गर्दी करू नये, शासकीय नियमांचे पालन करावे अशा प्रकारच्या सूचनांचा समावेश आहे. उपस्थित मुस्लिम बांधवांनी देखील या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत सण साजरा करण्याचे आश्वासन दिलं.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages