लोणावळा शहरातील गवळीवाडा विभागातील एका ५५ वर्षीय करोना बाधित रुग्णाचा आज बुधवारी मृत्यू झाला आहे. यामुळे लोणावळा शहरात करोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आता एकूण चार झाली आहे. यापूर्वी शहरातील वलवण येथील एक महिला, पोर्टर चाळ (रेल्वे कॉलनी) येथील एक महिला आणि गवळीवाडा विभागातील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गवळीवाडा विभागातील सदर बाधित व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल २१ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने आज बुधवारी सकाळी सदर व्यक्तीची प्राणज्योत मालवली.
काल मंगळवार दिनांक २८ जुलै अखेर लोणावळा शहरात एकूण ५२ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. यातील २५ रुग्ण हे आतापर्यंत पूर्णतः बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे आतापर्यंत ४८% इतकं राहिलेलं आहे. याशिवाय शहरातील ४ करोना बाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे प्रमाण एकूण बधितांच्या ७.७०% इतकं झालं आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ४
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४
भांगरवाडी - १२
नांगरगाव - ६
खंडाळा - ९
वलवण - २
गावठाण आणि बाजारपेठ, लोणावळा - ११
रेल्वे विभाग - ३
तुंगार्ली - १
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment