लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 28 July 2020

खंडाळ्यातील शिवाजी पेठेत एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण; लोणावळ्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५३

लोणावळा येथील खंडाळा विभागातील शिवाजी पेठेत एका ५५ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीवर मुंबई येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. या रुग्णामुळे आता खंडाळा विभागातील एकूण करोना बाधित रुग्णसंख्या १० झाली आहे. यातील ७ रुग्ण पूर्णतः बरे झाले असून सद्यस्थितीत येथील सक्रीय रुग्ण संख्या ३ इतकी आहे. तर संपूर्ण लोणावळा शहरातील सद्यस्थितीत एकूण सक्रिय रुग्णसंख्या २४ इतकी झाली आहे.

लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

गवळीवाडा  - ४
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी  - ४
भांगरवाडी  - १२
नांगरगाव  - ६
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा)  - १०
वलवण  - २ 
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ११
रेल्वे विभाग  - ३
तुंगार्ली  - १



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages