लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 16 July 2020

भांगरवाडी मधील रचना गार्डनमध्ये एक महिला करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील रचना गार्डन या ठिकाणी एका ६५ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता लोणावळा शहरातील करोना बधितांची संख्या वाढून २० झाली आहे. तर इतर ५ जणांची नोंद ही नवी मुंबई याठिकाणी करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी विभागातील रचना गार्डन येथील रहिवासी असलेल्या सदर महिलेचा स्वॅब देहूरोड येथील बढे हॉस्पिटलमध्ये गुरुवारी १६ जुलै रोजी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज शुक्रवारी प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages