गेल्या तीन वर्षांपासून मावळ तालुक्यामध्ये कार्यरत असणारे बालरोगतज्ज्ञ डॉ.अक्षय वानखडे हे नुकतेच करोना या आजारातून पुर्णतः बरे झाले. त्यांनी या आजाराबाबत आशा काही गोष्टी आपल्या फेसबुक वॉल वर शेअर केल्या आहे की ज्याचा फायदा निश्चितच प्रत्येकाला होईल. त्यामुळे त्यांची पोस्ट मी जशीच्या तशी या ठिकाणी पोस्ट करीत आहे. प्रत्येकाने ही पोस्ट नक्की वाचावी.
नमस्कार,
मी डॉ.अक्षय वानखडे बालरोगतज्ञ म्हणून गेल्या तीन वर्षांपासून मावळ तालुक्यामध्ये कार्यरत आहे. मी दि. 3/7/2020 ला ससून हॉस्पिटलच्या covid-19 ड्युटी नंतर पॉझिटिव्ह आलो होतो आणि दि. 15/7/2020 रोजी पूर्णपणे बरा होऊन आलो आहे. मला आज तुम्हाला ह्या आजाराबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत त्यानिमित्त ही पोस्ट शेअर करत आहे.
मित्रांनो आजही आपल्या समाजात ह्या आजाराबाबत अनेक अफवा आहेत जसे की, हा आजार बरा होत नाही, हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यावर परत येण्याची शाश्वती नाही वगैरे वगैरे. तर सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायचं आहे की हा आजार वेळेत उपचार, सकस आहार आणि काळजी जर घेतली तर पूर्णपणे बरा होतो. मला स्वतःला दम्याचाआजार असूनही मी पूर्णपणे ह्यामधून बाहेर आलो आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून जाऊ नका तर त्यावर अतिशय हिमतीने मात करा .
एक लक्षात घ्या हा आजार खूप संसर्गजन्य आहे (Highly contagious)त्यामुळे या आजारावर लस येईपर्यंत आपल्याला ह्या आजाराला सोबत घेऊन चालायचं आहे. एक महत्वाची बाब गेल्या पाच ते सहा महिन्यात ह्या आजाराबद्दल निदर्शनास आली ती म्हणजे ह्या आजाराची तीव्रता आधीपेक्षा खूप कमी झाली आहे आणि (Recovery rate)बरा होण्याचा दर हा जवळपास 70 टक्के पेक्षा जास्त आहे .बरं तुम्हाला वाटत की तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही तुमची काळजी चांगलीच घेतली असेल. तर मित्रांनो असं काही नाही, हा आजार एका फ्लू किंवा viral infection सारखा आहे. हे बघा, तुम्हाला सर्दी खोकला ताप आला होता, बरोबर आहे, अगदी त्यासारखा हा आहे. फरक एवढाच की आधीचे फ्लू सारखे व्हायरस (स्वाइन फ्ल्यू, गोवर, रूबेला) यावर लवकरात लवकर इलाज व उपचारपद्धती उपलब्ध झाली आणि ह्या आजारावर निघायला थोडा वेळ लागतोय.
त्यामुळे जर का तुमच्या आजूबाजूला किंवा कुटुंबांमध्ये कोणाला हा आजार झाला असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला आधार द्या आणि त्याला हे सांगा "अरे हे एक फ्ल्यू सारखे इन्फेक्शन आहे आज तुला झालय उद्या मला पण होऊ शकते." "काही नाही, डॉक्टर जस सांगतात त्याप्रमाणे आपण उपचार चालू करू आणि सात ते आठ दिवसात बघ तू परत घरी येशील" आणि रोज त्याला एक मेसेज किंवा फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस करा म्हणजे त्याला "पॉझिटिव" ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण झालंय काय, ह्या आजारामुळे लोक कमी, पण या आजाराच्या भीतीपोटी बरेच लोक खचून जातात. त्या व्यक्तीला एवढा आधार द्या की जसे आपण एखाद्याचं कोरोनावर मात करून आल्यावर स्वागत करतो अगदी तसेच पाठबळ तो व्यक्ती पॉझिटिव आल्यावर द्या .
🔴 ह्या आजाराचे नेमके लक्षण काय 🔴
सर्दी, खोकला, घसा दुखणे, तोंडाची चव जाणे अंगदुखी डोकेदुखी या सर्व लक्षणांना बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु निव्वळ थकवा येणे, अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारचे लक्षण सुद्धा कोरोनाचे असू शकतात. तसेच उलट्या-जुलाब हे सुद्धा कोरोनाची लक्षणे असू शकतात.
🔴 मी घेतलेलं डाएट 🔴
🔳 मिठाच्या पाण्याच्या गुळण्या किंवा बीटाडीन gargle(दिवसातून 5 वेळा)
🔳 रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी.
🔳 नंतर काढा (लवंग,मिरे, इलाईची, दालचिनी, सुंठ, हळद) उपाशीपोटी
🔳 अर्धा लिटर दूध किंवा एक ग्लास दूध (गोकुळ)
🔳 seasonal fruit. apple चालेल. (सर्दी खोकला असेल तर घेऊ नका)
🔳 उकळलेले एक किंवा दोन अंडी
(शाकाहारी लोकांसाठी मोड आलेले धान्य मटकी, वाटाणे,हरभरा, मूंग ई.)
🔳 जेवणामध्ये वरण, भात, पोळी ,भाजी , भाज्यांचे सूप
🔳 कोमट पाणी दिवसातून एक ग्लास दहा ते बारा वेळा
🔳 संध्याकाळी परत सकाळचं जेवण (आणि जेवनामधे नॉनव्हेज असेल तर खूपच चांगलं )
🔳 रात्री परत झोपताना एक ग्लास दूध .
🔳 प्राणायाम (अनुलोम-विलोम )
🔳 रोज 6 मिनिट वॉक टेस्ट. (पल्स ऑक्सी मिटर ह्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजण्याच्या उपकरणावर सहा मिनिट चालून झाल्यावर Spo 2 बघणे)
🔳 रोज दिवसातून दोन वेळा टेंपरेचर घेणे.
वर नमूद केलेला आहार आपण आताच नाही तर कोरोना गेल्यानंतर सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सुरू ठेवावा
तर मित्रांनो या आजाराला घाबरून न जाता मोठ्या हिमतीने व ताकदीने लढून ह्यावर मात करू या. "मी बरा झालो तुम्ही पण नक्की बरे व्ह्याल"
धन्यवाद
डॉ.अक्षय वानखडे
बालरोग तज्ञ.

Thank you so much Sir.🙏
ReplyDeleteThank you sir.
ReplyDeleteAaj mazi mrs positive ali ahe. Amhi home quarantine zalo ahot. Ek vichrycha hota. Amcha mulga 11 month cha ahe ani feeding pan chalu ahe. Tar tyache mummy kade jane safe rahil ka?