लोणावळा शहरात सोमवारी इराणी चाळ, गावठाण परिसरात एक ६५ वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागील १५ दिवसांपासून आजारी असल्याने तसेच रक्त दाबाचा त्रास झाल्याने संबंधित व्यक्तीला तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांचा स्वॅब करोना तपासणी साठी घेण्यात आला असता त्यांचा अहवाल आज सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून संबंधित बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात येणार आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment