लोणावळा येथील भांगरवाडी विभागातील दोन जणांच्या करोना चाचण्या आज सोमवारी पॉझिटिव्ह आल्या असून यामुळे आज शहरात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या तीन तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ३१ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १७ जुलै रोजी रचना गार्डन याठिकाणी एक महिला करोना बाधित आढळून आली होती. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील काही व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात सदर महिलेचा ११ वर्षीय नातू आणि ६५ वर्षीय पती यांचा समावेश आहे. यामुळे आता भांगरवाडी विभागातील एकूण करोना बधितांची संख्या ९ झाली आहे.
लोणावळा येथील कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या १३ जणांच्या स्वॅब चे अहवाल आज उशिरा प्राप्त झाले, त्यातील वरील दोन रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहे तर अन्य ११ रुग्ण निगेटिव्ह आले आहे. याशिवाय याठिकाणी घेण्यात आलेल्या अन्य ३७ जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त होणं बाकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment