लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 4 July 2020

मावळ तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी नऊ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

मावळ तालुक्यात करोना बधितांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असून आज शनिवारी एकाच दिवसात तालुक्यातील विविध भागात मिळून एकूण ९ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यातील आतापर्यंत एकूण करोना बधितांची संख्या १२७ झाली आहे. 

आज शनिवार दिनांक ०४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या करोना चाचणी अहवालात एकूण ९ जण करोना पॉझिटिव्ह झाल्याचे पुढं आलं आहे. यात तळेगावात २, लोणावळ्यात १, निगडे येथे १, गेहुंजे येथे १, सोमाटणे येथे २, वराळे येथे १ तर पाचाणे याठिकाणी १ रुग्ण आढळून आला आहे. 

मावळ तालुक्यात आतापर्यंत करोना बाधीत रुग्णांची संख्या एकूण १२७ झाली असून यात तळेगाव, लोणावळा आणि वडगाव या शहरी भागातील ५१ तर ग्रामीण भागातील ७६ रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागातील तळेगाव मध्ये अद्यापपर्यंत ४३, लोणावळा शहरात ६ तर वडगाव मध्ये २ रुग्ण मिळून आले आहे.

सध्या यातील सक्रिय रुग्ण संख्या ही ७४ असून या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याशिवाय आजपर्यंत ४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे तर आजवर तालुक्यातील ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages