लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 5 July 2020

लोणावळा शहरातील नांगरगाव विभागात अजून दोन जण करोना बाधित; बधितांची एकूण संख्या चार

लोणावळा शहरातील नांगरगाव विभागात रविवारी आणखी दोन करोना बधितांची भर पडली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील सक्रिय करोना बधितांची संख्या आतापर्यंत चार झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार नांगरगाव मध्ये गुरुवारी २ जुलै रोजी एका ६० वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या संपर्कात असलेली त्याची बायको, मुलगा आणि सून आशा तीन जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब करोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज रविवारी त्या सर्वांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील संबंधित व्यक्तीची बायको आणि सून या दोघींचे अहवाल हे करोना पॉझिटिव्ह आले आहे, तर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे आता या एकाच घरातील करोना बधितांची संख्या तीन तर नांगरगाव विभागातील एकूण करोना बधितांची संख्या चार झाली आहे. नांगरगाव मधील सदर परिसर यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

रविवारी आढळून आलेल्या या दोन रुग्णांमुळे लोणावळा शहरातील करोना बधितांची संख्या आता एकूण आठ झाली असून त्यातील वलवण आणि पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर खंडाळा येथील दोन जण पुर्णतः बरे झाले आहे. याशिवाय नांगरगाव मध्येच शनिवारी आढळून आलेल्या करोना बाधित महिलेच्या संपर्कातील ९ जणांचे अहवाल प्राप्त होणं आद्यपी बाकी आहे. या ९ जनांपैकी ५ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आज उशिरापर्यंत प्राप्त होण्याची आशा असून उर्वरीत चार जणांचे स्वॅब तपासणी साठी उद्या सोमवारी घेण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages