लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 5 July 2020

शिलाटणे याठिकाणी एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह; आज एकाच दिवशी मावळ तालुक्यात ८ जण करोना पॉझिटिव्ह

शिलाटणे (ता.मावळ) याठिकाणी एक ४५ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून या सर्वांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती हा समुद्रा इन्स्टिट्यूट, टाकवे याठिकाणी नोकरीला आहे. ही व्यक्ती वाल्हेकर वाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यास गेली होती. त्याठिकाणी त्यांचे काही नातेवाईक करोनाच्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेला हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून ३ जुलै रोजी बिर्ला हॉस्पिटल चिंचवड येथे स्वॅब घेण्यात आला होता. सध्या या करोना बाधित व्यक्तीवर तळेगाव येथे उपचार सुरू आहे. 

मावळ तालुक्यात आज रविवारच्या दिवशी ८ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे, ज्यात एका डॉक्टरचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यापैकी तळेगाव येथे २, लोणावळा येथे २, इंदोरी येथे ३ व शिलाटणे येथील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे आता तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या १३५ झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या ७७ झाली आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages