बुधवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालामध्ये लोणावळा विभागातून एकूण दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर उर्वरित सर्व शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे.
मावळ तालुक्यातून यावर्षी माध्यमिक शाळांत परीक्षेला एकूण ८१ शाळांमधून ४७९६ विद्यार्थी बसले होते. यातील एकूण ४७०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण सरासरी ९८.१७% इतकी राहिली. लोणावळा शहर आणि परिसरातील एकूण २० शाळांमधून १३३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी एकूण १३१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची एकूण सरासरी ९८.३५ टक्के राहिली.
लोणावळा केंद्र आणि परिसरातील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, गुरुकुल इंग्लिश मिडियम, डॉन बॉस्को, ऑक्झीलीयम कॉन्व्हेंट, उर्दू माध्यमिक विद्यालय, डी.सी. हायस्कूल, श्री एकविरा विद्यामंदिर - कार्ला, शान्तीसदन, सोजर विद्यालय - कुरवंडे आणि तुंग माध्यमिक विद्यालय या दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय ऑल सेंट चर्च (९४.११ टक्के), लोणावळा नगरपरिषद पंडित नेहरू विद्यालय (८७.५० टक्के), गुरुकुल मराठी माध्यम (९७.७५ टक्के), व्ही.पी.एस. हायस्कूल (९८.५१ टक्के), डॉ. बी. एन.पुरंदरे विद्यालय (९९.१० टक्के), शांतिदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय, मळवली (९८.४२ टक्के), लोणावळा नगरपरिषद विद्यालय, खंडाळा (९६.४२ टक्के), आंतरभारती बालग्राम विद्यालय (९५.४५ टक्के), वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय, देवघर (९०.९० टक्के) आणि नागनाथ विद्यामंदिर, औंधे (७६ टक्के) या शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उज्वल असे यश संपादन केले आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment