लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 30 July 2020

लोणावळा शहरात तब्बल सात जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील भांगरवाडी, आगवाली चाळ, गवळीवाडा आणि तुंगार्ली या चार विभागात मिळून तब्बल सात जणांचे अहवाल आज गुरुवारी करोना पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे लोणावळा शहरात आतापर्यंत एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करोना केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी काल बुधवारी एकूण १६ जणांचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यात भांगरवाडी याठिकाणी एक ४५ वर्षीय महिला आणि तिच्या १८ वर्षीय मुलाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आगवाली चाळ येथिल एक ३२ व्यक्ती आणि त्याचे ५२ वर्षीय वडील अशा दोघांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय तुंगार्ली येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

गवळीवाडा येथील एक ३० वर्षीय युवक आणि एक ५० वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल देखील आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांचे स्वॅब तपासणी साठी तळेगाव येथे एका खाजगी रुग्णालयात घेण्यात आले होते. 

लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

गवळीवाडा  - ६
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी  - ४
भांगरवाडी  - १४
नांगरगाव  - ६
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा)  - १०
वलवण  - २
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ११
रेल्वे विभाग  - ६
तुंगार्ली  - २



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages