लोणावळा शहरात आज गुरुवारी उच्चांकी आठवा करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी आजच्या दिवसात ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. यामुळे लोणावळा शहरात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी विभागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. एका खाजगी रुग्णालयात सदर व्यक्तीचा स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आला होता. यामुळे भांगरवाडी विभागातील एकूण करोना बधितांची संख्या आता १५ झाली आहे. लोणावळा शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या ६२ करोना बाधित रुग्णांपैकी २५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत लोणावळा शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ३३ इतकी झाली आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ६【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू - २】
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४【बरे झालेले रुग्ण - २ / मृत्यू - ०】
भांगरवाडी - १५【बरे झालेले रुग्ण - ६ / मृत्यू - ०】
नांगरगाव - ६【बरे झालेले रुग्ण - ६ / मृत्यू - ०】
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा) - १०【बरे झालेले रुग्ण - ७ / मृत्यू - ०】
वलवण - २ 【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू -१】
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ - ११【बरे झालेले रुग्ण - २ / मृत्यू - ०】
रेल्वे विभाग - ६【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू -१】
तुंगार्ली - २【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू - ०】
लोणावळा नगरपरिषद official या नगरपरिषदेच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेल ला subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment