लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 22 July 2020

लोणावळा जुन्या बाजारपेठत चार जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील 'जी' वॉर्ड, जुन्या बाजारपेठत चार जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. काल बुधवारी उशीरा हे अहवाल प्राप्त झाले. हे चारही रुग्ण एकाच कुटुंबातील आहे. यामुळे आता लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांची संख्या ४४ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जुन्या बाजारपेठत एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांची दोन मुलं अशा एकूण चार जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील पतीचे वय ३८ वर्ष असून पत्नीचे वय ३३ वर्ष आहे. तर त्यांच्या मुलांची वय अनुक्रमे ७ वर्ष आणि ३ वर्ष आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. 

लोणावळा शहरातील करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

गवळीवाडा ३
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी ४
भांगरवाडी ११
नांगरगाव ६
खंडाळा ९
वलवण २
गावठाण, लोणावळा ८
रेल्वे विभाग १



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages