लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 6 July 2020

गवळीवाडा, लोणावळा येथे आढळला करोना बाधित रुग्ण; लोणावळा शहरात रुग्णांची संख्या पाच

लोणावळा शहरातील गवळीवाडा याठिकाणी सोमवारी एक ३८ वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. यामुळे लोणावळा शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती ही चिंचवड येथे टेल्को कंपनीमध्ये कामाला आहे. या व्यक्तीला करोनाची काही लक्षणं दिसू लागल्याने लोकमान्य हॉस्पिटल याठिकाणी त्यांचा स्वॅब करोना तपासणी साठी घेण्यात आला. त्याचा अहवाल सोमवारी उशीरा प्राप्त झाला. सदर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित व्यक्तीला तात्काळ कोविड सेन्टर, तळेगाव येथे हलविण्यात आले असून, त्याच्या संपर्कातील चार जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून क्वारंटाईन करण्यात आले असून मंगळवारी त्यांचे स्वॅब करोना तपासणी साठी घेण्यात येणार आहे. दरम्यान गवळीवाडा विभागातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असून, प्रशासन तशी तयारी करीत आहे.

सोमवारी मावळ तालुक्यात विविध भागात एकाच दिवशी ११ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात सोमटणे याठिकाणी ४, माळवाडी याठिकाणी ४, कामशेत येथे १, तळेगाव येथे १ तर लोणावळा शहरातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील एकूण बधितांची संख्या आता १४६ झाली आहे. आतापर्यंत यापैकी ६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे, तर ०६ रुग्ण आजअखेर करोना मुळे दगावले आहे. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ७३ इतकी झाली आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages