लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 17 July 2020

पिंपळोली येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा; मावळ तालुक्यात आज तब्बल २९ जणांना करोनाची बाधा

कार्ला परिसरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून काल दहिवली व देवले येथे करोना बाधित रुग्ण आढळून आल्यावर आज शुक्रवारी पिंपळोली येथील ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागन झाली आहे.

सदर व्यक्ती हा रेल्वे विभागात कामाला असून त्याला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने स्पर्श हॉस्पिटल येथे तपासणी केली असता आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील सहा जण हाय रिस्क म्हणून नमूद करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात येणार आहे. सदर रुग्णाला लोणावळा येथील कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती कार्ला आरोग्य अधिकारी डाॕ भारती पोळ व आरोग्यसेवक शंकर जगताप व चंद्रकांत गवलवाड यांनी दिली.

मावळ तालुक्यात आज शुक्रवारी एकाच दिवसात २९ रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. यामध्ये एकट्या तळेगावात १७ तर लोणावळा व सोमटणे येथे प्रत्येकी ४ रुग्ण आढळून आले आहे. लोणावळा शहरातील खंडाळा विभागात काल गुरुवारी आढळलेल्या एका रुग्णाची नोंद काल न घेता आजच्या दिवशी घेण्यात आल्याने अनेक ठिकाणी ही नोंद ३० असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व रुग्ण मिळून आता तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०९ इतकी झाली आहे. यातील १६५ रुग्ण सक्रिय असून १३५ रुग्ण पूर्णतः बरे झाले आहे, तर ९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


3 comments:

  1. Thank you for the good work.... valuable updates are welcome

    ReplyDelete
  2. घरी रहा सुरक्षित रहा

    ReplyDelete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages