लोणावळा येथील नांगरगाव विभागात आज गुरुवारी आणखी दोन जणांचा कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही जण एकाच घरातील राहणारे आहे. यात एका ७० वर्षीय जेष्ठ नागरिक तर एक ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे आता नांगरगाव मधील करोना बाधित रुग्ण संख्या ७ झाली आहे तर लोणावळा शहरातील एकूण रुग्ण संख्या १४ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक ४ जुलै रोजी नांगरगाव येथील एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आलेली होती. त्यानंतर सदर महिलेच्या संपर्कातील काही व्यक्तींचे स्वॅब करोना चाचणी करिता घेण्यात आले होते. त्या चाचणी मध्ये सदर महिलेचा पती व मुलगा अशा दोन जणांचा करोना चाचणी अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांवर सध्या तळेगाव येथील कोविड केअर सेन्टर मध्ये उपचार सुरू आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment