लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 8 July 2020

मावळ तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण


मावळ तालुक्यात करोना आता उग्र रूप धारण करू लागला असून आज बुधवारी एका दिवसात तब्बल १७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बधितांची संख्या आता १७० इतकी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज मावळ तालुक्यात ज्या १७ रुग्णांची भर पडली आहे त्यात ग्रामीण मावळ मधील ११ तर शहरी भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागात एकट्या तळेगावत ५ तर लोणावळा शहरात एक रुग्णाचा (नांगरगाव येथील कंपनीमध्ये सापडलेल्या रुग्णाची नोंद मुंबई येथे आहे) समावेश आहे. तर ग्रामीण मावळ मध्ये सदुंबरे येथे ३, शिरगाव येथे १, कातवी येथे १, साई येथे १, वराळे येथे १, कान्हे येथे २ आणि कामशेत येथील २ दोन रुग्णांचा समावेश आहे. 

तालुक्यात आजअखेर सापडलेल्या १७० रुग्णांमधील ७९ रुग्ण पूर्णतः बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे. तर तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८३ इतकी आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages