लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 8 July 2020

भांगरवाडी मध्ये एक जण करोना पॉझिटिव्ह; लोणावळा शहरात रुग्णांची संख्या अकरा

लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागात एक ३७ वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. लोणावळा शहरात आज बुधवारी एकाच दिवसात आढळून आलेला हा दुसरा करोना बधित रुग्ण असून सकाळीच नांगरगाव येथील एका कंपनी मधील एक सुपरवायझरचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरात आता करोना बाधितांची संख्या ११ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी विभागात वास्तव्यास असलेल्या संबंधित करोना बाधित व्यक्तीला स्वतःलाच काही लक्षणं जाणवू लागल्याने त्याने १ जुलै पासून स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं. तद्नंतर त्याने सोमवारी स्वतः एका खाजगी रुग्णालयात जाऊन स्वतःचे स्वॅब तपासणी साठी दिले. त्याचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून हा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाचे कर्मचारी त्याठिकाणी पोचले असून त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात येणार असून, तेथील परिसर सॅनीटाइज करून प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

लोणावळा शहरात आज दोन करोना बाधित रुग्ण सापडले असतानाच लोणावळेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. ही बातमी म्हणजे गवळीवाडा विभागातील करोना बाधित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ज्या चार जणांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages