लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 8 July 2020

नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत एक जण करोना बाधित; चार जणांचे घेणार स्वॅब

लोणावळा येथील नांगरगाव विभागातील औद्योगिक वसाहती मधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारी एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे सदर कंपनी मधील या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर चार जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून या सर्वांचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नांगरगाव औद्योगिक वसाहती मधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही करोना बाधित व्यक्ती सुपरवायझर म्हणून कामाला आहे. सदर व्यक्ती दोन दिवसांपूर्वी मुंबईला गेली असून त्या ठिकाणी करोना संशयित म्हणून त्याचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आला होता. त्या चाचणी मध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित करोना बाधित व्यक्ती ही कंपनीच्या आवारात राहायला असल्याची माहिती मिळत असून त्याच्या सोबत राहणाऱ्या इतर तीन व्यक्ती तसेच कंपनी मधील अजून एक व्यक्ती अशा चार जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून स्वॅब घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. याशिवाय नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कंपनी मध्ये धाव घेत संपूर्ण कंपनी सॅनेटाईज करून घेतली आहे. याशिवाय कंपनीने सुट्टी जाहीर केली असल्याची माहिती मिळत असून गरज पडल्यास इतरही कामगारांना क्वारंटाईन करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages