लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 7 July 2020

मावळ तालुक्यातील मृतांचा आकडा वाढला; तालुक्यात आतापर्यंत ८ करोना बाधितांचा मृत्यू

मावळ तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता तालुक्यात करोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण ८ झाली आहे. सोबतच मागील सलग चार ते पाच दिवसांपासून रोजच्या रोज ८ ते १० च्या संख्येने वाढणाऱ्या करोना रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्यने दीड शतक पार केलं आहे. 

मावळ तालुक्यात मंगळवार दिनांक ०७ जुलै अखेर करोना रुग्णांची एकूण संख्या १५३ झाली असून यातील सक्रिय रुग्ण संख्या ही ७९ असून त्या सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर ६६ रुग्ण हे पूर्णतः बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. 

रुग्ण आढळण्याच्या प्रमाणाचे विश्लेषण केल्यास मावळ तालुक्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ९४ रुग्ण आढळून आले तर शहरी भागात हीच संख्या ५९ आहे. यातही लोणावळा, तळेगाव आणि वडगाव या शहरी भागातील केवळ एका तळेगावातच ४८ रुग्ण आहेत. थोडक्यात ग्रामीण भागात प्रमाण जास्त असले तरीही एकप्रकारे तळेगाव हे तालुक्यातील करोनाचा हॉटस्पॉट बनत चाललं आहे. तर दुसरीकडे जवळजवळ ७० हजारांची लोकसंख्या आणि फ्लोटिंग पॉप्युलशन पकडून एक लाखाच्या वरती वर्दळ असणाऱ्या लोणावळा शहरात आतापर्यंत केवळ ९ करोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील केवळ पाच रुग्ण सध्या सक्रिय आहे. 


Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages