लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 22 July 2020

लोणावळा शहरात ५ जण करोना पॉझिटिव्ह; तर शिलाटने, भाजे आणि पिंपळोली येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह

आज बुधवारी लोणावळा शहरातील विविध भागातून पाच व्यक्ती करोना बाधित आढळून आल्या आहेत. यात भांगरवाडी विभागातील दोन व्यक्ती, खंडाळा रस्टीक हायलँड येथील दोन व्यक्ती आणि गावठाण विभागातील एक व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांची संख्या आता ४० झाली आहे. याशिवाय आज लोणावळा ग्रामीण भागातील शिलाटने, भाजे आणि पिंपळोली या गावातून देखील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी विभागातील दिव्या हाईट्स सोसायटीमध्ये आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेली त्याची ३० वर्षीय पत्नी आणि ३ वर्षीय मुलीचा करोना चाचणी अहवाल आज बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भांगरवाडी विभातील आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ झाली आहे. याशिवाय खंडाळा विभागातील रस्टीक हायलँड परिसरात करोना पॉझिटिव्ह वॉचमनच्या संपर्कात आलेल्या दोन ४९ वर्षीय वॉचमनचा करोना चाचणी अहवाल देखील आज बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा विभागातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९ झाली आहे. 

पाचवा रुग्ण हा लोणावळा शहरातील गावठाण विभागातील असून या २८ वर्षीय युवकाचा करोना चाचणी अहवाल आज बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. 

लोणावळा शहरात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ४० झाली आहे. तर शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २४ इतकी आहे. आतापर्यंत शहरातील एकूण १३ रुग्ण पूर्णतः बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आज बुधवारी गवळीवाडा विभागातील करोना बाधित ६५ वर्षीय जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने शहरातील करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ झाली आहे. 

लोणावळा शहरात करोना बाधित रुग्ण आढळून येत असतानाच शहरालगतच्या ग्रामीण भागात देखील आज तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शिलाटने, भाजे आणि पिंपळोली या तीन गावातील गे रुग्ण असून त्यांचे वय हे २५ ते २७ च्या दरम्यान असल्याची माहिती मिळत आहे.

लोणावळा शहरातील करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

गवळीवाडा  - ४
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी  - ४
भांगरवाडी  - ११
नांगरगाव  - ६
खंडाळा  - ९
वलवण  - २
गावठाण, लोणावळा  - ४




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages