लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 17 July 2020

लोणावळा शहरात चौथा पॉझिटिव्ह रुग्ण; भांगरवाडी परिसरात २८ वर्षीय युवक करोना पॉझिटिव्ह

लोणावळा शहरात आज एकाच दिवसात चौथा करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. सदर बाधित व्यक्ती ही २८ वर्षीय असून भांगरवाडी विभागातील पाण्याची टाकी परिसरात राहण्यास आहे. यामुळे लोणावळा शहरात आता एकूण करोना बधितांची संख्या २३ झाली आहे. याशिवाय इतर ५ रुग्णांची नोंद ही नवी मुंबई याठिकाणी करण्यात आलेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीने काही लक्षण जाणवल्याने गुरुवारी १६ जुलै रोजी स्वतः तळेगाव येथे जाऊन आपले स्वॅब करोना चाचणी साठी दिले होते. आज शुक्रवारी १७ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. 

1 comment:

  1. Clap.... Clap.... Clap... Hats of and thanks to Lonavala Municipal corporation.....!!!! For risking ppls lives and the earnings and no learning they got from this..!!

    ReplyDelete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages