लोणावळा शहरात आज दोन महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधित रुग्णांची संख्या आता १२२ झाली आहे तर कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा येथून एकूण ९ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यातील २ महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर उर्वरित ७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये पोलीस लाईन, तुंगार्ली येथील एक २३ वर्षीय महिला तर वर्धमान सोसायटी मधील एका ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील वर्धमान सोसायटी मधील ५३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १२२ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ६४ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ५ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०६【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०५】
पांगोळी, वलवण - २१【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १४】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २४【बरे झालेले रुग्ण - १५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - १०【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०७】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】
गवळीवाडा - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】
खंडाळा - १७【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १२】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - १५【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०९】
सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】
भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment