लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 9 August 2020

वलवण, भांगरवाडी आणि अण्णाभाऊ साठे वसाहतीमध्ये करोना पॉझिटिव्ह; लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या १२१


आज लोणावळा शहरातील खंडाळा विभागात एक तर सिद्धार्थ नगर याठिकाणी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आजच्याच दिवसात  वलवण, भांगरवाडी आणि अण्णाभाऊ साठे वसाहतीमध्ये देखील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आज रविवारी लोणावळा शहरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ झाली आहे तर शहरातील आजवरची एकूण रुग्णसंख्या १२१ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या सर्व बधितांचे स्वॅब खाजगी रुग्णालयात घेण्यात आले होते. त्यात भांगरवाडी येथील ३७ वर्षीय व्यक्ती, अण्णाभाऊ साठे वसाहती मधील ६३ वर्षीय व्यक्ती आणि वलवण येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १२१ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५१ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ६६ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】 

पांगोळी, वलवण  - २२【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १५】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २४【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १०】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०७】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】

खंडाळा  - १७【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १२】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - १५【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०९】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】

भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages