लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 13 August 2020

लोणावळा शहरातील तुंगार्ली येथील कोरोना बधिताचा मृत्यू; शहरात ३ नव्या रुग्णांमुळे एकूण बधितांची सांख्य १४१


लोणावळा शहरातील तुंगार्ली विभागातील एका कोरोना बधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर मृत झालेल्या या ७२ वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २४ तासात कोरोना मुळे दगावलेला हा शहरातील दुसरा रुग्ण असून त्यापूर्वी काल अण्णाभाऊ साठे वसाहती मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लोणावळा शहरातील आतापर्यंत कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

याशिवाय आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार लोणावळा शहरात आज वलवण, भांगरवाडी आणि तुंगार्ली येथील प्रत्येकी एका व्यक्तीच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात वलवण येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा, भांगरवाडी येथील ७० वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा तर तुंगार्ली येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तुंगार्ली येथील आज पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा आज मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहे.

गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १४१ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६० झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ७४ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०८【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०५】 

पांगोळी, वलवण  - २४【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १६】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २७【बरे झालेले रुग्ण - १६ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - १०【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】

गवळीवाडा  - १२【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】

खंडाळा  - १८【बरे झालेले रुग्ण - ०८ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १०】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - २२【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १५】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】

भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages