लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 20 August 2020

कुणे ना.मा., ओळकाई वाडी, कुरवंडे, केवरे गावात पॉझिटिव्ह रुग्ण; लोणावळा ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह

लोणावळा शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील आता वाढू लागली आहे. शहरालगत असलेल्या कुणे ना.मा., ओळकाई वाडी, कुरवंडे, केवरे वसाहत या गावात मागील २४ तासात सात बाधित रुग्ण आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुणे ना.मा. येथील एक २४ वर्षीय महिला, एक २ वर्षीय लहान मुलगा, ओळकाई वाडी येथील एक २८ वर्षीय युवक, एक ४१ वर्षीय महिला आणि एक ६२ वर्षीय जेष्ठ महिला, कुरवंडे येथील ५३ वर्षीय पुरुष आणि केवरे गावातील २४ वर्षीय युवक असे एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय वाकसई येथील एका ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल देखील बुधवारी उशिरा पॉझिटिव्ह आला होता. 

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या मात्र पुणे येथील रहिवासी असलेला एका ३२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल देखील आज पॉझिटिव्ह आला आहे. 


ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages