लोणावळा शहरात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असून आज शहरातील विविध विभागातून तब्बल १२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १८७ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी गुरुवारी १८ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्यातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयातील ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
कोविड केअर सेन्टर येथून पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये वलवण येथील एक ५० वर्षीय, एक २० वर्षीय आणि एक ३४ वर्षीय असे तीन जण, गवळीवाडा येथील एक ३५ वर्षीय महिला आणि एक २६ वर्षीय महिला अशा दोन महिला, तुंगार्ली येथील एक ८४ वर्षीय जेष्ठ नागरिक, सिद्धार्थ नगर येथील एक ५० वर्षीय महिला आणि नगरपरिषद कार्यालय परिसरातील एक ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
खाजगी रुग्णालयातून पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये केळपेठ खंडाळा येथील एक ५२ वर्षीय व्यक्ती, जुना बाजार लोणावळा येथील ४९ वर्षीय व्यक्ती, सिद्धार्थ नगर येथील ६३ वर्षीय व्यक्ती, स्वराज्य नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment