लोणावळा येथील आण्णाभाऊ साठे वसाहतीमधील दोन महिलांसह खंडाळा येथील एक मुलगा आणि एक व्यक्ती अशा एकूण ४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात आज गुरुवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे तर आजवर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४५ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी बुधवारी १६ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आला होता. यातील ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर उर्वरित १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये अण्णाभाऊ साठे वसाहतीमधील एक ९० वर्षीय जेष्ठ महिला तसेच एका ५५ वर्षीय महिलेसह भोई आळी, खंडाळा येथील एक १५ वर्षीय मुलगा आणि नेताजी वाडी, खंडाळा येथील ३३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या या सात रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १४५ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६० झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ७८ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०८【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०५】
पांगोळी, वलवण - २४【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १६】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २७【बरे झालेले रुग्ण - १६ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - १०【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】
गवळीवाडा - १२【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】
खंडाळा - २०【बरे झालेले रुग्ण - ०८ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १२】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - २४【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १७】
सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】
भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment